अतिक्रमणे हटवून रस्त्याचे वाढीव काम पूर्ण करण्याची मागणी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | म्हैसाळ- नरवाड हा नेहमीच डांबरीकरणापासून उपेक्षित असणारा व रस्ता कामासाठी निधी मंजूर होवूनही तो पूर्ण करण्याकडे बांधकाम विभागाने चालढकल सुरु केली आहे. अतिक्रमणे हटवून रस्त्याचे वाढीव काम पूर्ण करावे अन्यथा, आंदोलन करावे लागेल. असा इशारा नरवाडचे नरवाड रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच अरुण कांबळे यांनी दिला आहे.
नरवाड – म्हैसाळ रस्ता डांबरीकरणाला आतापर्यंत पुरेसा निधी मिळाला नाही. त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवटच होत आलेले आहे. हा रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद बनला आहे. सध्या शासनाकडून रस्त्यातील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण करुन तो डांबरीकरण करावयाचा आहे. ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्हीकडं बाजू खुदाई केल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायतीने रस्त्याच्या साईड पट्टीच्या खालून पाणी योजनेचे पाईप टाकल्याने रुंदीकरणात अडचण आल्याचे सांगितले जात असले तरी ही पाईपलाईन सध्याच्या रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरत असताना बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे कोणताच पाठ पुरावा केलेला नाही.
भविष्यात रस्त्यात येणारी पाईप लाईन हे रस्त्याच्या अतिक्रमणात येत असल्याने तिला बाधा येणार असल्याने ती हटवून रस्त्याचे काम पूर्ण करावे. मात्र, हे काम न करण्याची ठेकेदाराची भूमिका दिसते. दररोज होणारे अपघात लक्षात घेवून हे काम तातडीने सुरु करुन पूर्ण न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नरवाड रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच अरुण कांबळे यांनी दिला आहे.