आंबेत येथे वर्षावास मालिकेचे पहिले पुष्प संपन्न….

रविवार दिनांक 28 जुलै 2024
सौजन्य् – आयू श्री. रुपेश गमरे
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा म्हसळा यांच्या विद्यमानाने वर्षावास मालिका 2024 च्या आयोजक करण्यात आले होते या वर्षावास मालिकेची पहिले पुष्प बौद्धजन सेवा मंडळ आंबेत यांच्या सहकार्याने आंबेत येथे संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ बौद्धउपासक माजी अध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती तालुका म्हसाळा स. बी पवार साहेब ,प्रमुख उपस्थिती हरिश्चंद्र मोहिते गुरुजी, रुपेश गमरे (सरचिटणीस तालुका शाखा) अशोक नाईक (खजिनदार तालुका म्हसळा )) यशवंत सुर्वे , (अध्यक्ष पूर्व विभाग) मनोहर तांबे,यशवंत गमरे उपस्थित होते तसेच प्रवचनकार ममता येलवे यांच्या अमूलवाणीतून ‘बाबासाहेबांना अभिप्रेत बौद्ध धम्म’ या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण ,पंचशील घेऊन उपस्थितांचे पाहुण्यांचेच स्वागत करून झाले झाली प्रास्ताविक मध्ये हरिचंद्र मोहिते सर यांनी वर्षावास चे महत्त्व सांगितले तसेच यशवंत सुर्वे यांनी धम्मगीत घेऊन सर्वांचा उत्साह वाढविला.
आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध धम्म याची माहिती मनोहर तांबे यांनी दिले बौद्धजन सेवा मंडळ आंबेत यांचे सर्व मान्यवर ,महिला मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रवचनकार ममता येळवे यांनी बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा बौद्ध धम्म मध्ये त्रिसरण पंचशील, याचबरोबर 22 प्रतिज्ञा या आपल्या आचारसंहिता आहेत असे सांगितले. त्यांच्या प्रवचनाने संपूर्ण महिलावर्गत उत्साह दिसून आला. अध्यक्षीय भाषणामध्ये स.भी पवार गुरुजी यांनी धम्म आणि मानव यांचीमाहिती सांगताना मानव हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे तो धम्माने संघटित होऊन सामाजिक कामकाज करून आपल्या जीवन व्यतीत करत असतो बुद्धांनी आपल्याला दिलेला विवेकवादी विज्ञानवादी धम्म आपण जोपासला पाहिजे या वर्षावासावर निमित्ताने आपण धम्म आत्मसात करून आचरण त् करून आपली प्रगती करावी अशा शब्दात त्यांन मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा शेवट करताना स्थानिक अध्यक्ष यशवंत गमरे यांनी सर्वांच्या आभार मानून कार्यक्रम संपविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन तालुका शाखेचे सरचिटणीस आयु रुपेश गमरे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित महिला मंडळ अध्यक्ष प्रभाताई साळवी ,नीलम गमरे लता गमरे ,इंदुबाई जाधव मालिका साळवी, वनिता बाबुराव मोरे, मनीषा गमरे ,वैशाली मोरे, विजयाताई मोरे ,तसेच बौद्धजन सेवा मंडळाचे अध्यक्ष यशवंत गमरे ,उपाध्यक्ष राजेश साळवी मोहन गमरे ,मनोज साळवी, अशोक साळवी, साळवी ,प्रमोद गमरे ,तरुणींमध्ये विद्यार्थिनी मनाली साळवी, अक्षता गमरे सायली साळवी इत्यादी उपस्थित होते.आशीर्वाद गाथा घेऊन कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यात आला .



