आमदार सुरेश खाडेकडून दलित समाजावर अन्याय ; न्यायमंत्र्यांकडे दाद मागणार ; सरपंच वासंती धेंडे

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
संपादक | जयंत मगरे
मिरज | एरंडोली (ता.मिरज) येथील दलित वस्ती कामांचे पाठवलेले पाच प्रस्ताव हे पात्र असताना डावलण्यात आले आहेत. खासदार व आमदारांच्या शिफारसीने या कामाचे प्रस्ताव मंजूर केल्याचे जिल्हा परिषदेचे जबाबदार अधिकारी सांगत असतील तर ज्या एरंडोली गावाने विधानसभा निवडणूकीत मताधिक्य दिले त्या गावावर व दलित समाजावर दलितवस्तीची कामे डावलून आ. सुरेश खाडे यांच्याकडून अन्याय का? असा सवाल करत राजकीय सूडबुध्दीने गावावर व दलित समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप सरपंच वासंती धेंडे यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या अन्यायकारक कारभाराविरोधात समाजिक न्याय मंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एरंडोली गावातील दलित वस्तीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. गटारींची कामे झाली नसल्याने दलित समाजाची मोठी झालेली अडचण लक्षात घेवून आपण या कामाचे पाच प्रस्ताव मिरज पंचायत समितीकडे पाठविली होती. पंचायत समितीने हे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले तर जिल्हा परिषद प्रशासनाने ४० गावांची कामे मजूर केली. मात्र, यामध्ये एरंडोलीचे दलितवस्तीचे पाच प्रस्तावमधील एकाही प्रस्तावाला मजूरी न देता ते प्रस्ताव डावलण्यात आले आहेत. आमदारांच्या शिफारशीने ही कामे मंजूर केल्याचे जबाबदार अधिकारी सांगत आहेत. आपण एक मागासवर्गीय महिला सरपंच म्हणून काम करीत आहे. विशेष म्हणजे एरंडोली गावाने विधानसभा निवडणूकीत जादा मताधिक्य दिले असतानाही आ. सुरेश. खाडे यांच्याकडून विकास कामाबाबत एरंडोली गावाला डावललून अन्याय का? असा सवाल करीत राजकीय सूडबुध्दीनेच दलित वस्तीची कामे डावलली आहेत. याबाबत आपण गप्प बसणार नसल्याचा इशाराही सरपंच वासंती धेंडे यांनी दिला.
समाजकल्याण मत्र्याकडे तक्रार करणार- सरपंच
दलितवस्ती कामात सातत्याने अन्याय करण्याचे प्रक्रार सुरु आहेत. एरंडोली गावातील दलित वस्तीतील कामे डावलून दलित समाजावर अन्याय झाला आहे. याबाबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेवून चौकशीची मागणी करणार असल्याचे सरपंच वासंती धेंडे यांनी सांगितले आहे.