आम्ही काँग्रेस पक्षासोबतच ; काँग्रेसच्या उमेदवारांचाच प्रचार करणार ; पालकमंत्र्यांना पाठिंबा नाही ; संजय मेंढे यांचा खुलासा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
आमच्या प्रभागामध्ये विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांचा फक्त सत्कार करण्यासाठी गेलो होतो. आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही, शिवाय पाठिंबा बाबत सुरेश आवटी यांनी केलेल्या विधानाशी सुद्धा आम्ही सहमत नाही. आम्ही मिरज पॅटर्न बरोबर नाही, तर आम्ही फक्त काँग्रेस पक्षासोबत आहोत. काँग्रेसचे वरिष्ठ जे निर्णय देतील त्याचे आम्ही पालन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मिरज शहर अध्यक्ष संजय मेंढे यांनी दिली. मिरजेत संजय मेंढे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तर एखादा भाजपमधील नेता आमच्याकडे फुटून आला तर वाईट वाटायचं कारण काय आहे ? काँग्रेसची ध्येय धोरण त्यांना मंजूर असतील तर ते येतील, आणि त्यांच्या उमेदवारी बाबत पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी यांनी दिली आहे.
पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या सत्कार करून आम्ही त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर सुरेश आवटी यांनी पत्रकारांना काँग्रेसच्या नगरसेवकांचा पालकमंत्री खाडे यांना पाठिंबा असल्याबाबत सांगितले. मात्र आम्ही आवटी यांच्या विधानाशी सहमत नाही. आम्ही मिरज पॅटर्न नव्हे तर काँग्रेस पक्षासोबत आहोत काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे सांगतील तोच आम्ही निर्णय घेणार आणि काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, असेही संजय मेंढे यांनी यावेळी सांगितलं.
आम्हाला निधी दिला होता. त्यामुळे आम्ही सत्कार करायला त्यावेळी आलो होतो. मात्र माजी नगरसेविका वहिदा नायकवडी यांना काही निधी मिळाला नव्हता. त्यामुळे त्या त्यावेळी आमच्या सोबत आल्या नव्हत्या, असं सांगून संजय मेंढे पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ मिळावा यासाठी आम्ही मागणी केली आहे, मात्र पक्षातील किंवा अन्य पक्षातील कोणता उमेदवार द्यायचा, याबाबत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आणि पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,असेही संजय मेंढे यांनी यावेळी सांगितलं.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी, माझी महापौर विजयराव धुळूबुळू, माजी नगरसेविका वहिदा नायकवडी, नगरसेविका बबीता मेंढे, माजी नगरसेवक करन जामदार, माजी नगरसेवक साजिद अली पठाण, काँग्रेसचे नेते सचिन जाधव, राकेश कोळेकर, वसीम रोहिले, नरेंद्र महाराज यांच्यासहित काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.