सामाजिक न्यायासोबत, सामजिक परिवर्तन घडविणे काळाची गरज ; भाई जगदीश इंगळे

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने सामजिक एकजूट परिषद संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात मानवी हक्क अभियानाच्या महिला अध्यक्षा सौ. रोहिणी खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या परिषदेला मार्गदर्शन करतांना भाई इंगळे म्हणले की, सामजिक न्याया सोबत सामजिक वैचारिक परिवर्तन घडविणे काळाची गरज असून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. तसेच शाहीर के. के. डाखोरे आपल्या प्रबोधनातून सांगितले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा बॅरिस्टर होवून भारतात परत आले तेंव्हा शाहू राज्यांनी त्यांच्या शिक्षणाची योग्य दखल घेवुन हत्तीवर मिरवणूक काढून साखर वाटून आनंद व्यक्त केला व त्याकाळात बाबासाहेबाना जरीचा पटका बांधून राजवाड्यात भोजन देवून जातीभेद नष्ट झाल्याचे संकेत दिले. तसेच जाहीर सभा घेवून तमाम बहुजनाला सांगीतले कि बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने आपल्याला नेता मिळालेला आहे असा संदेश दिला.
त्याच विचाराची शृंखला पकडून दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरिब मराठा, फासे पारधी, गावा कुसाबहेर राहणाऱ्या लोकांना संघटीत करून बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेत भाई जगदीश कुमार इंगळे कार्य करीत असून शाहू राजाच्या 151 व्या जयंतीचे औचित्य साधून वाशिम जिल्ह्यात सामजिक एकजूट परिषद यशस्वीपणे संपन्न होत असल्याचा आनंद व्यक्त केला.
तसेच शमशेर सिंग भोसले, फासे पारधी संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष वैशाली पवार यांनी सांगितले की, या सामजिक एक जुट परिषदेच्या माध्यमातून फासे पारधी समाजाला परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मानवी हक्क अभियानाच्या सौ. रोहिणी खंडारे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे हे खरोखर डॉ.बाबसाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेले हे कार्य आहेत. तसेच जिल्हाध्यक्ष राजु इंगोले यांनी सांगितले की, आमच्या संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या संकल्पनेतून आज जी सामजिक न्याय हक्क परिषद रोहिणी ताई खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून शाहू महाराजांना अभिप्रेत असलेले काम संघटनात्मक पातळीवर सर्वांनी करण्याचे आव्हान केले. परिषदेच्या अध्यक्ष सौ. रोहिणी खंडारे यांनी शाहू महाराजांच्या विचारावर प्रकाश टाकून भाई जगदिश कुमार इंगळे यांनी राज्यभर काम उभे केले त्याच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आज माझ्या कार्याची दखल घेवुन सामजिक एकजूट परिषदेचं अध्यक्ष पद दिलं त्याचं व बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच अभिनंदन करून शाहू महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते.
सामाजिक एकजूट परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजू इंगोले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विष्णू सरकटे, अजित गवई, भारत सोळंके, उमेश वाघ, सौ. जेनुर चव्हान, राजाराम पवार, गजानन शिंदे, भगवान शिंदे, लोडजी गिऱ्हे, संभाजी लोखंडे, देविदास लोखंडे, गजानन पांडे यांचे सहित रवी गवई यांनी परिश्रम घेतले.