आरोपीला अभय देणाऱ्या मुजोर पोलीस उपनिरीक्षकाची उचलबांगडी

LiVE NEWS | UPDATE
छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | सलमान शेख
सातारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अनिता तात्या बागुल यांनी आरोपींच्या बाजूने उघडपणे उभं राहत फिर्यादी व पीडितांना अरेरावीची भाषा वापरून धमकावल्याचा गंभीर आरोप आहे. तक्रारीचा गंभीरपणे पाठपुरावा करत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे तसेच बागुल यांची तडकाफडकी लोहमार्ग पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे पोलिस यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर आणखी एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून, जनतेच्या दबावामुळेच कारवाई झाली, हे स्पष्ट झालं आहे. गुन्हा क्र. 146/2025 च्या तपासात आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत फिर्यादीविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यांमुळे संतप्त झालेल्या पीडित आणि नागरिकांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला.
सलग तीन दिवसांच्या उपोषणानंतर, पोलीस निरीक्षक संग्राम ताटे आणि गुन्हे शाखेचे पोलिस पंडित यांनी उपोषणकर्त्याला आश्वासन दिलं की दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
या लढ्यात समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांचे मार्गदर्शन लाभलं तर शेख सलमान यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते व गावकरी ठामपणे उभे राहिले, ज्यामुळे अखेर पोलिस प्रशासनाला झुकावं लागलं.