आयुक्तांचा मनमानी कारभार ; उपोषणाचा तिसरा दिवस ; गेंड्याच्या कातडीचे अधिकारी कुंभकरण झोपेत

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचारा विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 7 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले.आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
उपोषणातील प्रमुख मागण्या ;
देवणी तालुक्यातील शासनाचा महसूल बुडवणाऱ्या खडी केंद्रावर कारवाई करा.
खोपेगाव ता.लातुर येथे कोट्यावधीचे होत असलेल्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करा.
औसा येथे इनामी जमिनीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यावर कारवाई करा.
देवणी तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे होत असलेले निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशीची करा.
बुलढाणा येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवा.
छत्रपती संभाजी नगर येथील ड्रेनेज समस्या व महावितरणच्या गैरकारभारावर कारवाई करा.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बेकायदेशीर ताडीचे दुकान हटवा. इ. मागण्या करण्यात आल्या आहेत.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषण करण्यात आले असून, आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. परंतु, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा प्रशासनातील गेंड्याच्या कातडीचे अधिकारी कुंभकर्ण झोपेत असुन उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून करीत आहेत. सदर प्रकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना असे वाटते की आझाद मैदानावरही न्याय मिळेना.
सदर आमरण उपोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मदरफी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. उपोषणात महिला प्रदेश सचिव आसिया रिजवी (ठाणे), प्रदेश कार्याध्यक्ष माधव मारकवाड (नांदेड), सचिन मोरे (रत्नागिरी), नीतू बाखिजा (ठाणे), तानाजी मोरे, श्रीकांत मोरे, अरुण मोरे, विजय मोरे, राहुल लालवाणी, स्वप्निल मोरे, प्रदीप मोरे, सलमान शेख, बद्रुद्दीन शेख (छत्रपती संभाजी नगर), जाकीर बेग (बुलढाणा), हकीम सौदागर (लातुर), कैलास पाटील (रायगड) हे उपस्थित होते.