उपोषणकर्त्यांना दमदाटी ; मूजोर पोलीस हवालदाराची उचलबांगडी !…

LiVE NEWS | UPDATE
मुंबई | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
आझाद मैदान (मुंबई) येथे कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल चौहाण लोवासिंग व त्याच्यासोबत असणारे पोलीस कर्मचारी यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या संबंधित विभागाकडे घेऊन न जाता फक्त वेळ काढूपणा करत आहेत. मंत्रालयाकडे अर्ज न पाठवता टाईमपास करून उपोषणकर्त्याची फसवणूक करून उपोषणकर्त्याला दमदाटी व अरेरावी करत असल्याने संबंधित दोषी पोलीसाविरुद्ध कारवाई करून आझाद मैदानावरून बदली करणे. अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी मंत्रालयात तक्रार देऊन आत्मदहनाचा इशारा देताच हेड कॉन्स्टेबल चौहाण लोवासिंग यांची आजाद मैदानावरुन हकालपट्टी करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की, मंत्रालयात पत्र देऊन आझाद मैदान मुंबई येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने दि.12/08/2024 रोजी उपोषणास बसण्यात आले. उपोषणकर्ते आजाद मैदानावर उपोषणास बसले असल्याची सूचना देण्याचे काम व कर्तव्य पोलीस कर्मचारी यांची असून त्यांनी जाणून-बुजून कर्तव्यात कसूर करून दररोज रोजच्या रोज उपोषणाची सूचना दिले नाही त्यामुळे उपोषणकर्त्यानां समाधान करण्यासाठी व लेखी पत्र देण्यासाठी व संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी उपोषणकर्त्यास संपर्क केले नाही. त्यामुळे उपोषणाचे दिवस वाढत गेले व आर्थिक व मानसिक त्रास उपोषणकर्त्यांना झाला याची जबाबदारी संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर आहे.
तसेच उपोषणकर्ते सदर पोलीस हेड कॉन्स्टेबल चौहाण लोवासिंग व इतर पोलीस कर्मचारी यांना संपर्क व प्रत्यक्ष भेटून उपोषणकर्त्यांच्या उपोषणाची सूचना व पत्रव्यवहार संबंधित सचिव व मंत्री महोदय यांच्याकडे त्वरित देण्यात यावे, अशी विनंती केल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल चौहाण लोवासिंग यांनी उपोषणकर्त्यास दमदाटी करून अरे-रावीची भाषा वापरली. असे करून संबंधित पोलीस कर्मचारीने आपल्या पदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात जाणून-बुजून कसूर करीत आहेत. त्यामुळे उपोषणकर्त्यास न्याय मिळण्यास अडथळा निर्माण झाल्याने सदर पोलीस हेड कॉन्स्टेबल चौहाण लोवासिंग यांची आझाद मैदान पोलीस स्टेशन येथून तात्काळ बदली करून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी येणाऱ्या उपोषणकर्त्यास न्याय मिळवून द्यावे अन्यथा, महाराष्ट्र प्रदेश सचिव आसिया रिजवी हे मंत्रालयासमोर आपल्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करीत असल्याची तक्रार दिल्याने सदर तक्रारीची दखल घेऊन प्रभारी पोलीस निरीक्षक परिमंडळ १ वि.शाखा मुंबई यांनी पोलीस हवालदार लोभासिंग छगन चव्हाण यांना आजाद मैदान वरून कुलाबा पोलीस ठाणे येथे उचलबांगडी केली.