गुन्हे विश्व्महाराष्ट्र

एक कोटींच्या बनावट नोटा जप्त, पोलीस कर्मचाऱ्यासह पाच आरोपी अटकेत

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | जयंर मगरे

मिरज | महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या धडाकेबाज पथकाने बनावट नोटा छापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर मोर्चा टाकत मोठा पर्दाफाश केला. या कारवाईत कोल्हापूरमधील एका कंपनीवर छापा टाकून तब्बल १ कोटी ११ लाख ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ५०० रुपयांच्या ९८ लाख ४३ हजार ५०० आणि २०० रुपयांच्या ८५ हजार ८०० बनावट नोटा, नोटा छापण्यासाठी लागणारा लॅपटॉप, प्रिंटर, इतर साहित्य आणि विनानंबर प्लेटसह इनोव्हा गाडीचा समावेश आहे.

पोलिसांनी या कारवाईत सुप्रीत काडाप्पा देसाई (२२, गडहिंग्लज), राहुल राजाराम जाधव (३३, कोरोची), इब्रार आदम इनामदार (४४, कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (कोल्हापूर) आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८, मुंबई) या पाच आरोपींना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, अटकेत आलेला इब्रार इनामदार पोलीस कर्मचारी असल्याचे उघड झाले.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आणि पथकाच्या धाडसी कामगिरीचे कौतुक केले. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण रासकर देखील उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, सदर पथकाला लवकरच बक्षीस देण्यात येणार आहे तर बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीवर मोठा धक्का आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही