भ्रष्टाचाराविरोधात रणसंग्राम ; प्रशासन गप्प, आंदोलक ठाम
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयासमोर ‘अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती’चे बेमुदत उपोषण, मागण्यांवर अधिकाऱ्यांचे मौन

LiVE NEWS | UPDATE
छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मराठवाड्यात भ्रष्टाचाराची पाळंमुळं उखडून टाकण्यासाठी आणि झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी ‘अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, महाराष्ट्र राज्य’तर्फे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असूनही प्रशासनाने अजूनही ठोस भूमिका घेतली नाही. आंदोलनकर्त्यांचा रोष शिगेला पोहोचला आहे.
“हे प्रशासन झोपलंय की भ्रष्टाचाराचं संरक्षण करतंय?” असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, असा निर्धार त्यांनी स्पष्ट केला.
ठोस मागण्या
आंदोलनकर्त्यांनी १० प्रमुख मागण्या पुढे केल्या असून त्या पुढीलप्रमाणे
👉🏻 औसा तालुक्यातील ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई.
👉🏻 निलंगा तालुक्यातील चांदोरवाडी रस्त्याच्या निकृष्ट कामावर चौकशी.
👉🏻 पैठण तालुक्यात वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील बेकायदेशीर खरेदी-विक्री प्रकरणी गुन्हा.
👉🏻 जिन्सी पोलीस स्टेशन मैदानावरची अवैध अतिक्रमणे हटवून टाकी बांधकामासाठी जागा मिळावी.
👉🏻 मानवत येथील एसबीआय शाखेत गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबन.
👉🏻 गेवराई ब्रूकबाँड गावात मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानाची जमीन उपलब्ध करावी.
👉🏻 मनपा वॉर्ड 105 मधील राहूल नगरातील गल्ल्यांमध्ये सिमेंट रस्ता व ड्रेनेज कामे तातडीने सुरू करावीत.
👉🏻 सादत नगरात पाण्याच्या भयंकर तुटवड्यावर तातडीने उपाययोजना.
👉🏻 स्मार्ट सिटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी.
👉🏻 वरिष्ठ लिपिक सुनील कासेवाडी यांच्यावर कारवाई व चौकशी समिती नेमावी.
आंदोलनात संताप उफाळला
अनेक मागण्या स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराशी निगडित असून, प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे जनतेचा संताप उसळला आहे. अद्याप एकाही मागणीवर ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी पुढील टप्प्यात जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, प्रदेश सचिव अहमद अन्सारी व जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे. जिल्हा उपाध्यक्ष बद्रुद्दीन, सचिव फिरोज खान, रमेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य शेख रऊफ आदींसह मोठ्या संख्येने महिला-पुरुष पदाधिकारी व नागरिक उपस्थित आहेत.