मिरजकरांना दिलासा ! कोमात गेलेले मिशन हॉस्पिटल पुन्हा चालू होणार जोमात !…

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | ‘वैद्यकीय पंढरी’ अशी ओळखल्या जाणाऱ्या मिरजेला व मिरज शहरातील आणि मिरज बाहेरील रुग्णांना दिलासा देणारे सुमारे १३० वर्षांची रुग्णसेवेची परंपरा असलेले मिरजेचे ऐतिहासिक “वान्लेस” म्हणजेच “मिशन हॉस्पिटल” हे दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे बंद अवस्थेत असल्याने तेथील पाचशे कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीवर होते. आता हेच मिशन हॉस्पिटल पुन्हा चालू होण्याच्या आशा पल्लवीत होण्याची शक्यता आहे. तशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून “महाराष्ट्र दणका” न्यूज 24″ ला मिळाली आहे. आता मिशन हॉस्पिलच्या कामगारांचा प्रश्न मार्गी लावून मिरजेतील मिशन हॉस्पिटल हे पुन्हा पुनर्जीवित होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आता प्राप्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मिशन हॉस्पिटला नवसंजीवनी मिळालीच तर सर्वच नागरिकांना रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या रोजी रोटीचा प्रश्नही मार्गी लागण्याची आशा आहे.
व्यावसायिकांतही समाधानाचे वातावरण…
मशिन हाॅस्पिटल हे मिरजेचे वैभव आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नातेवाईकांमुळे गांधी चौकात गर्दी असायची त्यामुळे या हाॅस्पिटलने अनेक व्यावसायिक कुटुंबांना आधार दिला. हाॅस्पिटल पुन्हा सुरु होण्याची आशा असल्याने व्यावसायिकांतही समाधानाचे वातावरण आहे.