किशोर भोरावत यांची मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती (ZRUCC) सदस्यपदी निवड

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शहर प्रतिनिधी | श्रीकांत यमगर
रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन चे जिल्हाअध्यक्ष व मा.मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांची मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती (ZRUCC) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सदरची निवड ही दोन वर्ष कालावधीसाठी असेल.
सांगली जिल्ह्यांचे मा.पालकमंत्री तथा कामगार मंत्री मा.आमदार डाँ.सुरेशभाऊ खाडे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विन वैश्णव यांच्याकडून ही निवड करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवास व स्थानकांतील समस्या, सह्याद्री एक्सप्रेस मुंबई पर्यंत सुरु करणे, कोल्हापुर-मुंबई वंदेभारत, सकाळीची मिरज कलबुर्गी एक्सप्रेस व लातुर मिरज इंटरसिटी सुरु करणे, मिरज जंक्शन चे रखडलेले पिटलाईन चे काम व मिरज जंक्शनचे माँडेल स्टेशनचे काम सुरु करण्यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदिप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटिल, श्रीकांत माने, पंडितराव कराडे (तात्या), वाय सी कुलकर्णी,मधुकर साळुंखे व पाडुंरंग लोहार यांनी सांगितले.