केला मनाचा मोठेपणा ; सुरेखा नाईक यांचा सरपंच पदाचा राजीनामा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली व राजकिय दृष्ट्या महत्वाची असणारी आरग ग्रामपंचायतीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आरग गावच्या विद्यमान सरपंच सुरेखा संदीप नाईक यांनी अखेर सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.
आरग ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुरेखा संदीप नाईक यांच्यावर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत अविश्वास ठराव तहसीलदार यांच्याकडे दाखल करण्यात आला होता.
गेल्या तीन वर्षापासून सरपंच पदावर कार्यरत असलेले सुरेखा संदीप नाईक यांच्यावर अचानक अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने आज मनाचा मोठेपणा दाखवून सरपंच पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपवला आहे. विरोधकांनी राजकीय स्टंटबाजी करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्टंट केल्याचे पॅनल प्रमुख विशाल जाधव यांनी केला आहे.
विरोधकाने आमच्याबरोबर बसून चर्चा केली असती तर प्रश्न सुटला असता, असे न करता विरोधकांनी थेट तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करून अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे आम्ही आज मनाचा मोठेपणा दाखवून राजीनामा सादर केला आहे. असे सरपंच सुरेखा नाईक यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले आहे.