क्रांतिसिंह नाना पाटील जयंती सप्ताह १ आॉगस्ट ला सुरु

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विटा / खानापूर प्रतिनिधी | गणेश धेंडे
दि.१ आॉगस्ट २०२४ ते दि.९ आॉगस्ट २०२४ या काळात क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जयंती सप्ताह साजरा केला जात आहे.अशी माहिती अॕड.सुभाष पाटील व भाई सुभाष पवार यांनी दिली.
दि.१ आॉगस्ट रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिन या दिवशी सप्ताहाचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक वाचन चळवळीतील कार्यकर्ते मा.सुभाष कवडे हे प्रमुख पाहुणे आहेत. दि. ३ आॉगस्ट हा दिवस क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म दिवस असून या दिवशी नाना पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक व संस्थेच्या आवारात वृक्षारोपन करणेत येणार आहे. दि.९ आॉगस्ट हा भारतीयांचा “क्रांति दिन” असून या दिवसी सप्ताहाचा समारोप प्रमुख अतिथी प्रा.डॉ. श्रीमंत कोकाटे सर व अध्यक्ष मा. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते समारोप होईल.या कालावधीत लोक विद्यापीठ मध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पालक विद्यार्थी यांच्यात स्पर्धा, निबंध लेखन,अभिनव बालवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या शिवाय दि.११ आॉगष्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतु मा.श्री. तुषार गांधी यांना प्रदान करण्यात येणार आहे.या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.ज्ञानेश महाराव उपस्थित राहणार आहेत. या प्रमाणे क्रांतिसिंह नाना पाटील जयंती सप्ताह याचे नियोजन केले आहे.