महाराष्ट्रसामाजिक

खटावमध्ये आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते १५ लाखांच्या कामाचे उद्घाटन

सांगली | महाराष्ट्र दणका न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे राबविण्यात येत असलेल्या आमदार आपल्या दारी, ग्रामविकास जनसंवाद दौरा व आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर कामांचे उद्घाटन करण्यासाठी आमदार इद्रिस नायकवडी यांचा दौरा मंगळवार १२/ ०९/ २०२५ रोजी खटाव व लिंगनूर येथे झाला.

खटाव गावचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिर परिसरातील सुमारे १५ लाख रुपयांच्या कामाचे उदघाटन आमदार नायकवडी यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी माजी मंत्री ना. अजितराव घोरपडे (सरकार), नगरसेविका आयशा नायकवडी, मिरज विधानसभा पक्षप्रमुख महादेव दबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे, सुलेमान मुजावर, आबा पाटील (आरग), तुषार खांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार नायकवडी यांनी खटावच्या जनतेशी संवाद साधत गावातील समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मात्र नागरिकांनीही वेळोवेळी ऑफिसला येऊन आवश्यक कागदपत्रे पुरवावीत, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन पी. जी. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी केले होते.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही