खटाव मध्ये शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या शाखेचे भव्य उदघाटन

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | सांगली जिल्हा शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख मा. शरद यमगर व मा.परशुराम बनसोडे तालुका प्रमुख मिरज यांच्या अध्यक्षते खाली दि. 08/05/2025 रोजी खटाव ता. मिरज जि. सांगली येथे बांधकाम कामगार सेना या शाखेचे उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी मा. विजय कांबळे यांना शाखाप्रमुख या पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
जिल्हाप्रमुख मा. शरद यमगर म्हणाले की, शिवसेना आणि कामगार यांचे अतूट नाते आहे. मराठी माणूस आणि कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम शिवसेनेने सातत्याने केले आहे. यावेळी बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनेविषयी सर्व माहिती दिली व बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजणांच्या हक्कासाठी सर्वतोपरी पद्धतीने लढण्याचे आश्वासन दिले. येत्या काही काळात बांधकाम कामगार सेनेच्या शाखा गावागावात काढून प्रत्येक विभागातील अधिकारी यांच्या कडून होणारी जनतेची अवहेलना समजावून घेऊन शिवसेना स्टाईल पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले.
शाखेचे उदघाटन आजचे प्रमुख पाहुणे सहकारी मित्र शिवसेना पक्षाचे मिरज विधानसभा प्रमुख मा. समीर लालबेग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. समीर लालबेग यांनी शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी यांचे कामाचे कौतुकास्पद पद्धतीने मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच कायम सोबत काम करून कशाप्रकारे शिवसेना संघटना सांगली जिल्हामध्ये वाढेल यासाठी लागेल ते मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली. सोबतच आज बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या घरोपयोगी भांडी साहित्याची शिबीर पण यशस्वी रित्या पार पडली.
यावेळी मा. अण्णासाहेब देशमुख जिल्हाप्रमुख राष्ट्रीय कर्मचारी सेना व मा. विक्रम चव्हाण ओबीसी जिल्हाप्रमुख यांनी शिवसेना संघटना वाढण्यासाठी काय केले पाहिजे यावर मनोगत व्यक्त केले. बांधकाम कामगार सेनेच्या या शाखेचे तसेच आजच्या शिबिराचे भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मिरज तालुक्यातील बांधकाम कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, तसेच ओबीसी उप जिल्हाप्रमुख मा. श्रीकांत यमगर, ओबीसी सचिव मा. विजय माळी तसेच खटाव मधील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेचे धडाडीचे मिरज तालुकाप्रमुख मा. परशुराम बनसोडे यांनी सर्व मान्यवर तसेच ग्रामस्थ यांचे आभार मानले व गावात शिवसेना पक्षाची आज पहिली मोठ बांधली गेली आहे. कायम शिवसेना ही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यामधील 1 मजबूत दुवा राहिल असे आश्वासन दिले.