खटाव येथे गळफास लावून तरुणाची आत्महत्या

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
मिरज | खटाव येथे संतोष सुजाता काबंळे (वय 28) या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे
या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, संतोष सुजाता कांबळे या तरुणाने घरगुती भांडणाच्या वादातून काल रात्री (दि . 16 ) रोजी रात्री 12 वाजता राहत्या दोरीच्या सहाय्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे . आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर कांबळे वस्तीत शोककळा पसरली आहे. आत्महत्या केलेल्या संतोष सुजाता काबंळे यांच्या पश्चात पत्नी तीन मुली आहेत.
या प्रकरणी पोलिस पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना भ्रमणध्वनी वरून माहिती कळविले त्यानंतर मिरज ग्रामीण पोलिस घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे . मिरज ग्रामीण पोलिसांनी मृतदेय मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले होते शवविच्छेदनानंतर गावात अंत्यविधी करण्यात आले . या प्रकरणाची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात असल्याने पोलीस हवालदार गंगधर साहेब आणि ओमासे साहेबानी पंचनामा केले असून हवालदार संदीप शिंदे साहेब अधिक तपास करीत आहेत ..