
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सध्या गंभीर दुरावस्थेत आहे. शाळा परिसरात पाणी साचले असून तलावासारखा स्वरुप निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना पाणी आणि चिखल ओलांडून वर्गखोल्यांमध्ये जावे लागत आहे, त्यामुळे त्यांचा शिक्षणावर परिणाम होत आहे.

शाळेतील लाखो रुपयांचे फर्निचर पाण्याने आणि धुळखात खराब होत असून, वर्गखोल्यांमध्ये अतिरिक्त डेस्क-बेंचमुळे उग्र वास पसरला आहे. विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या हौदाजवळ घाणी साचल्याने आरोग्यावरही धोका निर्माण झाला आहे.

पालकांनी प्रशासनाचे दुर्लक्ष पाहून संतप्त होत, आठ दिवसात समस्या सोडवली नाही तर तिव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे. स्थानिक आमदार आणि वरिष्ठ प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
ही शाळा स्वतंत्र्यपूर्व काळातील जुनी असून, या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात नावलौकी मिळवली आहे. मात्र, शाळेची सद्यस्थिती पाहता, शिक्षणाच्या दर्जावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसते. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.