क्राईमगुन्हे विश्व्महाराष्ट्रविदर्भ

गणेशोत्सवात गुन्हेगारांना पोलिसांचा दणका

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

गणेशोत्सव म्हटलं की भक्तिभावाचा उत्सव, पण त्याच वेळी गुन्हेगारी प्रवृत्ती डोकं वर काढू नये म्हणून पोलिसांनी या वर्षी शस्त्र अधिनियमाच्या कारवायांतून थेट संदेश दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पदभार स्विकारताच अपक्रमाविरुद्ध धडाकेबाज मोहिम हाती घेतली. त्यात दारूबंदी, गुटखा, जुगारासह शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईकच झाल्याचे दिसत आहे.

२७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात गणेशोत्सव निमित्त जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी “शस्त्र अधिनियम विशेष कारवाई मोहीम” उभी केली. यामध्ये ३१ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वाशिम शहरातील नालंदा नगरात राहणाऱ्या संजय आनंदा चव्हाण (वय २७) याला जेरबंद केले. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली. वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याच मोहिमेत केवळ शहरापुरतेच नव्हे तर ग्रामीण भागातही पोलिसांनी चांगलाच धडाका लावला. अनसिंग, मंगरुळपीर, कारंजा शहर, मालेगाव आणि कारंजा ग्रामीण या पोलीस ठाण्यांत प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे शस्त्र अधिनियमांतर्गत नोंदवण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवायांनी गुन्हेगारी प्रवृत्तींचे डोके थंड झाले असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला मजबूत आधार मिळाला आहे.

या कारवायांचे नेतृत्व पोलीस अधीक्षक अनुज तारे तसेच अपर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम यांनी केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रदीप परदेशी आणि त्यांची टीम रात्रंदिवस कामाला लागली. या टीममध्ये पोउपनी शेखर मास्कर, पोना महेश वानखडे, राजकुमार यादव, पोअंम अविनाश वाढे, तुषार ठाकरे, भुषण ठाकरे, शुभम चौधरी, महिला पोअंम तेजस्विनी खोडके आणि चालक पो.अंमलदार सुनिल तायडे यांचा सक्रिय सहभाग राहिला.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही