चक्क खासगी जागेतील मारुती सुझुकी शोरूमची बेकायदेशीरपणे तोडफोड ; सांगली मिरज रोडवर तणाव ; सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेचा अजब कारभार

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजब कारभार केला आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली थेट खाजगी जागेत जाऊन बेकायदेशीरपणे मारुती सुझुकी शोरूमची तोडफोड करण्यात आली आहे. जेसीबीने मोडतोड करून लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. यावेळी शोरूमचे अधिकारी कर्मचारी, नागरिक यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. येथील वातावरण तणावग्रस्त बनले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिक आक्रमक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या वर बाजू ढकलण्याचे काम सुरू केलं.
सांगली मिरज रोडवर कृपामाईच्या जवळ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि पीडब्ल्यूडी यांच्या वतीने रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्रमण काढण्याचे काम सुरू झालं. मात्र नोटीस न देता दुकानं आणि घर तोडली जात आहेत. तोंड बघून एकावर कारवाई केली जाते आहे आणि दुसऱ्यावर कारवाई केली जात नाही. असा आरोप नागरिकांनी केला आहे. मारुती सुझुकी शोरूम च्या खाजगी जागे जाऊन शोरूमच्या इमारतीवर जेसीबी चालवण्यात आला. इमारतीची मोठ्या प्रमाणात मोडतोड करून लाख रुपयांचा नुकसान करण्यात आलं. तिथले कर्मचारी ही खाजगी जागा आहे आणि सर्व बांधकाम परवाने आहेत असं सांगत असताना सुद्धा त्यांच ऐकून घेतलं गेलं नाही. कर्मचारी आणि नागरिक या ठिकाणी संतप्त झाले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केल्या नंतर धक्कादायक माहिती समोर आली.
महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे घोरपडे साहेबांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या वर बाजू ढकली. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितले ते आम्ही पाडण्यास सुरुवात केली आहे असं सांगितलं. कागदपत्र तपासण्याचे किंवा नोटीस देण्याचं काम हे पीडब्ल्यूडीच आहे, असं घोरपडेनी सांगितलं.
तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याने सुद्धा प्रकरण अंगलटी आल्यामुळे यापासून अंग झटकण्याचं काम केलं. संतप्त जमावाने सांगितल्यामुळे जेसीबीच्या ड्रायव्हरने ती इमारत पाडण्यास सुरुवात केली. आम्ही काही इमारत पडण्यास सांगितलं नाही असं अजब उत्तर प्रसारमाध्यमांना दिलं.
दरम्यान, मारुती सुझुकीचे स्थानिक मॅनेजर यांनी महापालिका आणि पीडब्ल्यूडीने बेकादेशीरपणे आमच्या खाजगी जागेत येवून आमच्या शोरूमची तोडफोड केली आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर कारवाई करण्यात यावी. आम्ही पोलिसात या बाबत तक्रार देणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे.