जय मल्हार क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा पूर्व अध्यक्षपदी महेंद्र नाईक यांची नियुक्ती

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | वडी येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र नाईक यांची जय मल्हार क्रांती संघटनेच्या सांगली जिल्हा पूर्व अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणाऱ्या नाईक यांनी आतापर्यंत तालुक्यातील अनेक गरजू, निराधार महिला व अपंग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांच्याद्वारे असंख्य लाभार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली मदत मिळाली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत संघटनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे यांनी त्यांची जिल्हा पूर्व अध्यक्षपदी निवड केली आहे.
सांगली जिल्ह्यातील गोरगरीब, वंचित, शोषित, दुर्लक्षित घटकांचे प्रश्न अधिक तीव्रतेने शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटनेचा विस्तार व्यापक पातळीवर करण्यासाठी ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
या निवडीनंतर महेंद्र नाईक यांनी सांगितले की, “समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि हक्कासाठी लढा देत राहू. गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि संघटनेला मजबूती देणे यासाठी पुढील काळात कार्यरत राहणार आहे.”
या निवडीमुळे वडी गावासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन केले जात असून, सामाजिक क्षेत्रात त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.