जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्याकडून भैय्या इंगळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

LiVE NEWS | UPDATE
कोल्हापूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
कागल | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांनी कागल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मा. श्री. धैर्यशिल उर्फ भैय्या इंगळे (सरकार) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना पुष्पगुच्छ अर्पण करून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी दादा कांबळे यांनी भैय्या इंगळे यांच्या समाजकारणातील सक्रियता, लोकसंपर्क व सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, भैय्या इंगळे हे स्थानिक राजकारणात जनतेच्या मनात घर करणारे, प्रामाणिक व तत्पर कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना दिशा मिळाली असून त्यांचा अनुभव नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
तसेच कांबळे यांनी इंगळे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी काळात अधिक यश मिळावे, अशी शुभेच्छा दिली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी. आर. कांबळे, कागलचे माजी नगरसेवक सौरभ पाटील, शाहूवाडी तालुका अध्यक्ष विश्वास सरूडकर, नितीन राऊत यांच्यासह पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी देखील भैय्या इंगळे यांना शुभेच्छा देत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमात आपुलकीचे आणि उत्साही वातावरण लाभले. या वाढदिवसानिमित्त इंगळे यांनी सर्व शुभेच्छुकांचे आभार मानत सामाजिक कार्यासाठी आपली बांधिलकी कायम राहील, असे आश्वासन दिले.