जिल्हा परिषद समाज कल्याण निधी वाटपात चंगू-मंगुंची रेस ; कागदोपत्री लवकरच पोलखोल करून मनमानी कारभाराला राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे लावणार ब्रेक…

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे जिल्ह्यामध्ये चर्चेत असणाऱ्या जोडगोळी (चंगू मंगूं) ने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे 11 कोटी निधी मर्जितील गावांना आणि ठेकेदारांना बेकायदेशीर रित्या आणि मनमानी पद्धतीने देण्याचा घाट घातल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी केला आहे.
महादेव दबडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांना समान निधी वाटप करावा, ही मागणी उचलून धरली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट हा भाजपचा मित्र पक्ष असल्याने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हे मिरज विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण विभागाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या कार्यालयातील चंगू मंगू हे पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून त्यांच्या परस्पर मर्जीतील गावांना आणि ठेकेदारांना निधी वाटप करत असल्याचा आरोप महादेव दबडे यांनी केला आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा ३४ कोटीचा निधी ३१ मार्च अखेर खर्ची पडणे अपेक्षित असताना, त्यातील फक्त २३ कोटीचा निधी खर्ची पडला आहे. उर्वरित ११ कोटीचा निधी अद्याप शिल्लक आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर चंगू मंगु नी अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकून मर्जीतील गावांना आणि ठेकेदारांना हा निधी दिला तर या चंगू मंगूंचा लवकरच कागदोपत्री पोलखोल करणार, असा इशारा महादेव दबडे यांनी दिला आहे.
आचारसंहिता लागणार आहे म्हणून चंगू मंगू ची धावपळ सुरू आहे. परंतु, हा निधी सम-समान वाटप न करता चंगूं मंगूंच्या मर्जीतील गावांना नियम बाह्य रित्या वाटप चालू असल्याचे समजत आहे. सांगली जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा ११ कोटीच्या निधीचे बेकायदेशीर पणाने चालू असलेले वाटप थांबविण्यात यावे. सन 2018- 2019 ते 2023-2024 पर्यंतच्या पंचवार्षिक बृहत आराखड्याला पुणे समाज कल्याण आयुक्तांची परवानगी असताना मान्यता संपल्यानंतर सुद्धा चंगू मंगूंच्या दबावामुळे समाजकल्याण समिती ११ कोटी रुपयांच्या निधीचे बेकादेशीर वाटप करत असल्याचे समजले आहे. हे तात्काळ थांबविण्यात यावे. अन्यथा, आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू, असा इशारा महादेव दबडे यांनी दिला आहे.