टाकळीत पोलीस पाटील अन् कुटुंबीयांना बेदम मारहाण ; पोलिसांकडून आरोपीना अभय ; पोलीस पाटील संघटनेचा आंदोलनाचा इशारा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरज | टाकळी येथे एक संतापजनक घटना घडली आहे. गावातील गणेश मंडळामध्ये रात्री उशिरापर्यंत वाजत असलेला स्पिकर बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलीस पाटील संजय बाबू माने व त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने पोलीस पाटील संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
टाकळी येथे जनसेवा गणेश मंडळाचा ध्वनीक्षेपक रात्री अकरा वाजल्यानंतर सुरु असल्याने पोलीस पाटील संजय माने यांनी आवाज बंद करण्यास सांगितले. या कारणावरून राजू करांडे याने संजय माने यांना तू कोण सांगणार अशी दमदाटी करीत मारहाण केली. यावेळी माने यांची पत्नी, मुलगा, मुलगी व आई हे सर्वजण तेथे आल्यानंतर राजू करांडे आशुतोष करांडे अंकिता करांडे सानिका करांडे सुवर्णा करांडे राम करांडे बाबुराव करांडे यांनी माने कुटुंबीयांना काठया व लाथाबुक्याने मारहाण बेदम मारहाण केली. पोलीस पाटील संजय माने यांना ग्रामीण पोलीसांची वेळेत मदत मिळाली नसल्याने त्यांनी कुटुंबासह पोलीस ठाण्यात जाऊन यां बाबत फिर्याद दिली. मात्र पोलिसांनी केवळ तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदुषण होवु नये, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते व साऊंड सिस्टीम धारकांच्या पोलीसांनी बैठका घेवुन त्यांना सुचना व दिल्या होत्यां. टाकळी येथील जनसेवा गणेश मंडळाने मोठ्या आवाजात स्पीकर लावल्याने याबाबत तक्रारीवरुन टाकळी पोलीस पाटील संजय माने यांनी संबधित मंडळांना स्पीकर बंद करण्यास सांगितले. यां कारणावरून त्यांना बेदम मारहाण झाली. असे असतानाही पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल न करता मंडळाच्या संबंधित कार्यकर्त्या विरुद्ध किरकोळ कारवाई केली. पोलीस पाटील हे पोलीस दलाचाच एक भाग असुन त्यांना प्राप्त अधिकारानुसार ते शासकीय कर्तव्य बजावित असताना त्यांना मारहाण करण्याऱ्या विरुद्ध विरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भास्कर पाटील व मिरज तालुकाध्यक्ष मल्लय्या स्वामी यांनी पोलीस उपअधिक्षक प्राणिल गिल्डा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. संबंधित आरोपीविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल न झाल्यास येत्या दोन दिवसात संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.