LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची प्रथम त्रैमासिक बैठक मा.जिल्हाधिकारी साहेब सांगली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी पानटपरी तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी तसेच सुगंधी खुली तंबाखू मावा विक्री करणाऱ्या पान टपरीवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना देण्यात आल्या. तसेच रेस्टॉरंट,बार,बस स्थानक,रेल्वे स्टेशन,हॉस्पिटल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीवर अन्न औषध व प्रशासन तसेच पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात यावे, अशी सूचना देण्यात आल्या. तसेच तंबाखू सेवनाच्या दुष्परिणाबाबत ग्रामीण स्तरावर जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करण्याकरिता गाव पातळीवरील सरपंच व ग्रामसेवक यांना प्राधिकृत करणे बाबत सूचना देण्यात आल्या. विविध संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात याव्यात, अशी सूचना देण्यात आल्या.
सदर बैठकीसाठी श्री.डॉ.राजा दयानिधी *जिल्हाधिकारी सांगली), श्री. डॉ.विक्रम सिंह कदम (जिल्हा शल्य चिकित्सक), मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, मा.वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका (जिल्हा सल्लागार), डॉ.मुजाहिद अलास्कर,माध्यमिक (उपशिक्षणाधिकारी), सौ.शेंडगे (मॅडम) प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी, श्री.रामचंद्र टोणे तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक व सहाय्यक सहभागी संस्थेचे (अध्यक्ष) श्री.रवींद्र कांबळे, जिल्हा (सदस्य) श्री.उदय भोसले (समुपदेशक) श्री.अभिजीत पाटील (सोशल वर्कर) श्री.मालतेश तांदळे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.