पुण्यात अवैध कब्जा करुन दिव्यांगाला केले जबरदस्ती बेघर

LiVE NEWS | UPDATE
पुणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
पुण्यात विश्रांतवाडीतील देठेवाड्याचे रहिवासी अमोल देठे हे १००% दिव्यांग आहेत. देठेवाडीत त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. वाड्यातीलच पिंट्या धिवार आणि त्याच्या घरच्यांनी अमोल यांच्या दिव्यंगत्वाचा फायदा घेत त्यांना राहत्या घरातून जोर जबरदस्तीने काढून टाकले व अवैध पद्धतीने त्यांच्या घरावर कब्जा केला आहे. जर याबाबत कोणाकडे तोंड उघडले तर तुझे काही खरे नाही. ताबडतोब पुणे शहर सोडायचे अशी धमकी दिली. म्हणून अमोल आज पुणे सोडून रस्त्यावर भिक मागण्यास मजबूर आहे.
पुण्याच्या विश्रांत वाडीतील रहिवासी चाळीस वर्षीय अमोल देठे यांच्याबाबत घडलेला एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अमोल हे शंभर टक्के दिव्यांग असुन त्यांचे आई वडील हयातीत नाही. आई वडिलांच्या पश्चात आजी सारुबाई देठे यांनी संभाळ केला. जन्मतः दिव्यांग असल्याने त्यांचे संपूर्ण जीवन इतरांवर अवलंबून आहे. आजी गेल्यानंतर अमोल यांच्यावर फार वाईट दिवस आले. ‘कोण देईल तेव्हा खाईल’ अशी परिस्थिती त्यांच्यावर आली. पण त्यांचा नाईलाज होता दिव्यांगत्वामुळे त्यांना स्वतःच्या पायावर साधे उभे ही राहता येत नाही. एक एक दिवस काढणे त्यांना कठीण झाले होते. अशातच कमी की काय ? जे वाड्यातीलच पिंट्या धिवार आणि त्याच्या घरच्यांनी अमोल यांना त्यांच्या राहत्या घरातुन बाहेर काढले आणि त्यांच्या घरावर अवैधपणे कब्जा केला. तसेच जर याबाबत कोणाकडे तोंड उघडले तर तुझे काही खरे नाही, अशी धमकी दिली. अगोदरच ‘हालत का मारा’ अशी त्यांची परिस्थिती आणि त्यात अशा जीवघेण्या धमकीला घाबरून अमोल निमूटपणे देठेवाड्यातून बाहेर पडले. कोणाचाही आधार राहिला नाही म्हणून रस्त्यावर भीक मागून दिवस काढण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. या सर्व परिस्थितीची हकीकत अमोलची मोठी बहिण मनिषा जगताप यांना समजली.
मनिषा यांनी अमोलची शोधा शोध चालू केली असता त्यांना अमोल जंगलात अतिशय दयनीय अवस्थेत सापडले. तसेच अमोल यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार बहिण मनिषाला कथन केला. लहान भावाची ही अवस्था बघून मनिषाने हिम्मत करून याचा जबाब विचारण्याकरिता पुण्याला गेली असता, तेव्हा समजले की, ज्यांनी या घराचा कब्जा केला आहे त्यांनी अमोल यांच्या घरात भाडेकरू ठेवले असून ते स्वतः इतर ठिकाणी राहत आहेत. मनिषा यांनी नशिक ते पुणे असे चार – पाच वेळेस ये जा केली परंतु, त्यांचा सामना काही झाला नाही. बहिण मनिषा यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून या अन्याय विरोधात लढण्याइतपत देखील त्यांची परिस्थिती नाही. म्हणून तर आजपर्यंत ते अमोल यांच्या हक्काच्या घरावर कब्जा करून बसले आहेत.
सध्या अमोल नाशिक येथे आपल्या मोठ्या बहिणीकडे आहेत. बहिणीची परिस्थिती बेताची आहे याची अमोल यांना जाणीव आहे. बहिण मनिषा यांची तब्येत सतत बिघडलेली असते. भावाची अशी परिस्थिती पाहून माझ्या पश्चात भावाचे काय होईल ? हा प्रश्न नेहमीच त्यांना पडलेला असतो. आम्हाला न्याय मिळेल की नाही ? माझ्या भावासोबत जे घडले त्याला कोण वाचा फोडेल की नाही ? असे प्रश्न दोघं भावंडं विचारत आहेत.
माझी तब्येत ठीक झाली की, मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची भेट घेणार आमच्यावर झालेला अन्याय दूर करा व पुणे पोलिस प्रशासनास योग्य ते आदेश द्यावे. असे गाऱ्हाणे मांडणार असल्याचे एका पत्राद्वारे कळविले.
“माझा गुन्हा फक्त इतकाच आहे की, मी अपंग आणि अढानी आहे. म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुखयमंत्री अजिदादा पवार, दिव्यांगाचे काम करणारे आमदार बच्चु कडू साहेब व सर्व सामाजिक संघटना,कार्यकर्ते यांना हाथ जोडून विनंती आहे की, माझे घर मला मिळवून द्यावे आणि जबाबदार लोकांवर कारवाई करून मला नुकसान भरपाई मिळवून द्यावी. जेणे करून माझे पुढचे जीवन सुरळीत होईल.”