महाराष्ट्र

तानंगमध्ये वृद्धाची आत्महत्या

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

मिरज तालुक्यातील तानंग गावात राहणाऱ्या एका वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धोंडीराम उद्धव पाटील (वय ७०, रा. पाटील मळा, तानंग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे तानंग गावात आपल्या घरात एकटेच वास्तव्यास होते. रविवारी (ता.५) त्यांनी घरात गळफास घेतल्याचे सकाळी उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर आयुष टीमच्या मदतीने मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे तानंग परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही