तारीख पे तारीख…! स्वराज्य संस्थांची निवडणूक उन्हाळ्यात होण्याची शक्यता धूसर !… राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुकांचा होतोय भ्रमनिराश !…

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार तरी कधी ? गेल्या तीन वर्षापासून होणारी चर्चा न्यायालयीन तारीख पे तारीकने राजकारण्यांच्या विस्मरणात जाऊ लागली आहे. सर्वोच्च न्यायालयातील आजच्या याचिकांच्या सुनावणीत एकमत न झाल्याने पुन्हा तारीख देण्यात आल्याने होळीच्या सुट्टीमुळे आणखी तारखा वाढण्याची शक्यता लक्षात घेता उन्हाळ्यात निवडणूक होईल ही शक्यता धुसर झाली आहे. हिवाळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ओबीसी आरक्षणाचा सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयीन निवाडा होईल अशी आशा होती. परंतू, झालेली सुनावणी काही मिनिटेच होऊन पुन्हा स्थगित झाली. स्थानिक स्वराज्य निवडणूका ओबीसी आरक्षणात आडकल्या आहेत. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचना जुनी की नवी यावर २३ याचिकाकर्ते आणि सरकारचे एकमत न झाल्याने सुनावणीची तारीख पुन्हा पडली. आणि महापालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उन्हाळ्यात होण्याची शक्यता मावळली आणि पुन्हा निवडणुकीची तयारी केलेल्यांच्या आशेवर पाणी फिरल्याची भावना निर्माण झाली.
गेल्या तीन वर्षापासून ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. परिणामी प्रत्यक्षात सुनावणी न होता “तारीख पे तारीख” पडत आहे. २५ फेब्रुवारीला तेच घडले. पुन्हा तारीख पडली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक याचिकेवर पुन्हा ४ तारखेच्या सुनावणीतही निकाल आला नाही आणि पुन्हा पुढची तारीख पडली, तर ही निवडणूक उन्हाळ्यात होण्यची शक्यता नाही. पावसाळ्यानंतर दिवाळ्यापर्यंत ही निवडणूक जाऊ ही शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
परिणामी गेल्या तीन वर्षापासून जास्त काळ रखडलेल्या महापालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता आणखी पुढे गेल्या. आता त्या कधी होतील, याची शाश्वतीच राहिली नसल्याने निराशेचे वातावरण आहे.
सत्ताधारी भाजपाचा भ्रमनिराश…
विधानसभेला ऐतिहासिक यश मिळाल्याने महायुती त्यातही भाजप या निवडणूकीच्या जोरदार तयारीला लगेचच लागली होती. उन्हाळ्यात ती होण्याच्या शक्यतेतून त्यांनी सभासद नोंदणी सुरु केली. विधानसभेच्या निकालाची पुनरावृत्ती या निवडणूकीत होईल, अशी त्यांना आशा होती. मात्र, मात्र आज पुन्हा तारीख पडल्याने त्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.
तर निवडणूका हिवाळ्यात होण्याची शक्यता…
९ ते १६ मार्च या आठ दिवसांच्या होळीच्या न्यायालयीन सुट्टीनंतर पुढची तारीख मिळणार आहे. त्यावेळी वरील मुद्यांखेरीज इतर मुद्यांवर एकमत झाले नाही, तर निकाल येणार नाही. परिणामी ही निवडणूक हिवाळ्यात जाणार आहेत.