दसरा, दिवाळीत फोडणी महागली ! खाद्य तेलाचे दर कडाडले ; सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज/कुपवाड प्रतिनिधी | राजू कदम
केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला असून तब्बल २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी यामुळे हॉटेल व्यवसाय सर्वच ठिकाणचे दरामध्ये प्रचंड वाढ झाली असून आतील व्यवसाय दह टक्के वाढ झाली असल्याचे चित्र दिसत आहे.
ग्रामीण व शहरी भागात सध्या वीस रुपयांपासून ३० रुपये पर्यंत मिळणारा वडापाव आता ४० रुपये पर्यंत पोहोचला असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला ऐन दसरा व दिवाळी तेलाचे दर वाढल्याने मोठे नाराजीचे सूर उमटत असून नेमका सण करायचा का नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी महागाईचा तोटा फक्त सर्व सामान्य नागरिकालाच होत असून दिवाळी व दसऱ्यामध्ये सर्व शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांना महागाई भत्त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण नाही हा प्रत्येक वेळी तोटा सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांनीच का सोसायचा असं संवाद ग्रामीण भागात सध्या जोर धरत असून ही महागाई अशाच पद्धतीने वाढत गेल्यास याचा तोटा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच होणार अशी चित्र सध्या विरोधकांनी सर्वसामान्य नागरिकासमोर उभे केले आहे.
जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश अशी ओळख असणाऱ्या भारतात तेलबियांच्या घसरत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असताना सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा परिमाण खाद्य तेलाच्या किमतीवर झाला आहे. सरकारने ही घोषणा करतात खाद्य तेलाच्या किमती किलोमागे २५ ते ३० रुपयांची वाढले आहेत. त्यामुळे आता स्वयंपाक घरातील फोडणी महाग झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.
सरकारने शनिवारी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली. त्यात आयात करण्यात येणाऱ्या कच्या तेलावरील आयात शुल्कात २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २५ टक्के वाढ तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ३५.७५ टक्के वाढवले आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात २५ ते ३० टक्के वाढ करावी अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, या करवाढीमुळे त्यामुळे आता ११० रुपये किलोला मिळणारे सोयाबीन तेल आता १३० रुपयांना झाले आहे. तर शेंगदाना तेल १७५ वरुण १८५ झाले आहे. तर सूर्यफुल तेल हे ११५ वरून १३० झाले आहे. साधारण 25 ते 30 रुपयांची वाढ किलोमागे झाली आहे.
सोयाबिन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क वाढल्यामुळे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड सोयाऑइलने तब्बल २ टक्के तोटा दाखवला. रॉयटर्सने ऑगस्टच्या अखेरीस दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात होणाऱ्या प्रादेशिक निवडणुकांपूर्वी सोयाबीन उत्पादकांना मदत करण्यासाठी भारत वनस्पती तेलांवरील आयात कर वाढविण्याचा विचार करीत आहे. वनस्पति तेल ब्रोकरेज कंपनी सुनविन ग्रुपचे सीईओ संदीप बाजोरिया म्हणाले, ‘बऱ्याच काळानंतर सरकार ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्याही हिताचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस पिकासाठी शासनाने ठरवून दिलेली किमान आधारभूत किंमत मिळण्याची शक्यता वाढली आहे. देशांतर्गत सोयाबीनचे दर प्रति १०० किलो ४,६०० रुपये (५४.८४ डॉलर) आहेत, जे राज्य सरकारने निश्चित केलेल्या ४,८९२ रुपयांच्या आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत.