महाराष्ट्र

मिरजमध्ये भीषण अपघात : पेट्रोल टँकरखाली चिरडून सायकलस्वार ठार

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

मिरज | मिरज एमआयडीसी रोडवर महात्मा गांधी पोलीस स्टेशनजवळ आज भीषण अपघात घडला. पेट्रोल टँकरच्या चाकाखाली सायकलस्वार चिरडला जाऊन जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

मृत सायकलस्वाराचे नाव परशुराम शंकर सुतार (वय ७१, रा. कमान वेस, घोरपडे वाडा, गणेश तलावाजवळ, मिरज) असे आहे. अपघात इतका भीषण होता की मृतदेह चेहऱ्यापासून कमरेपर्यंत छिन्नविच्छिन्न झाला.

घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. माहिती मिळताच महात्मा गांधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही