पंचशील सेवा संघाचे वर्षावास प्रवचन मालिकेचे पुष्प दुसरे संपन्न………..

सौजन्य आयु. रुपेश गमरे
बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा ही आपली आचारसंहिता आहे__रुपेश गमरे
माणगाव गोरेगाव पंचशील सेवा संघ व बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ८४१/१ते ५व पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिका 2024 चा आयोजन करण्यात आले आहे. या प्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प गोरेगाव संबोधि बुद्ध विहार येथे दिनांक २७ जुलै २०२४ रोजी गुंफले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील घेऊन झाली तसेच मान्यवरांचे स्वागत करून झाली.कार्यक्रमाला विभागातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते प्रवचनकार श्री रुपेश दीपक गमरे यांनी ‘बाबासाहेबांची धम्मक्रांती’ या विषयावर प्रवचन देत असताना बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा देताना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्रिसरण , पंचशीला बरोबर 22 प्रतिज्ञा देऊन आपल्याला आपली आचारसंहिता दिली. यावेळी बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा आधुनिक बौद्ध धम्म यासाठी आपण आपल्या पिढीला तयार करायला हवे असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित पंचशील सेवा संघाचे विश्वस्त सरचिटणीस संदीपजी साळवी,तुकाराम लोखंडे विजय जाधव बळीराम हाटे सुप्रिया साळवी (महिला मंडळ अध्यक्षा) संघमित्रा गायकवाड (महिल संघ सचिव,ग्रामपंचायत सदस्य) सुवर्णा हाटे(उपाध्यक्षा),राखी मोरे(ग्रामपंचायत सदस्या) , विजया गायकवाड,सुनंदा मोरे,रेश्मा साळवी. प्रणाली जाधव, योजना शिंदे रोहिता लोखंडे, विशाखा साळवी रश्मी साळवी,इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साळवी यांनी केले आयु. राजू मोरे सर यांनी सर्व मान्यवरांचे, महिला मंडळ व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यात आला.


