वारणा नदी काठावरील झाडाला लटकलेल्या माणसाचा आढळला मृतदेह

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरज तालुक्यातील कवठेपिरान-दुधगाव दरम्यान वारणा नदीपात्रात एका झाडाला लटकलेला मृतदेह सोमवारी आढळून आला. स्पेशल रेस्क्यु पथकाने साडेतीन किलोमीटर चिखलात पायपीट करीत नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. मृत व्यक्ती भेंडवडे (ता. हातकणंगले) येथील असून भास्कर अंकुश वासुदेव (वय ४७) असे मृताचे नाव आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी वारणा नदीला पूर आला होता. या पुरात वाहत येऊन ते कवठेपिरान-दुधगाव पांजरपोळजवळ नदीकाठावरील झाडाला अडकले असावेत, असे अंदाज पोलिसांनी व्यक्त केली. याबाबत माहिती अशी की, सोमवारी सांगली ग्रामीण पोलिसांनी वारणा नदीकाठावरील एका झाडाला मृतदेह अडकल्याची माहिती मिळाली. ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्पेशल रेस्क्यु फोर्सला पाचारण केले. रेस्क्यु पथकाचे कैलास वडार, महेश गव्हाण, सचिन माळी, आकाश कोलप, अमीर नदाफ, शिवराज टाकले, स्वप्नील धुमाळ आदि तातडीने मदतीला धावले. वारणा नदीचा पूर ओसरल्याने शेतात चिखल झाला आहे. या चिखलातून साडेतीन किलोमीटर पायपीट करीत पोलिस व रेस्क्यु टीम नदीकाठावर आले. 25 फुट उंचीच्या झाडावर मृतदेह अडकला होता. दोरीच्या सहाय्याने तासभराच्या प्रयत्नानंतर मृतदेह खाली उतरविला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.