परशुराम बनसोडे यांच्या कामाची दखल घेत प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाच्या मिरज तालुकाध्यक्ष पदी निवड

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
प्रहार जनशक्ती पक्ष सर्वच राजकिय पक्षापेक्षा आगळे-वेगळे काम करत असून “प्रहार ३० % राजकारण, ७० % समाजकारण” करत असुन असंख्यजण प्रहार पक्षामध्ये मध्ये सामील होत आहेत. खटाव (ता.मिरज) येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे परशुराम बनसोडे यांच्या कामाची दखल, काम करण्याची तळमळ पहाता प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाच्या मिरज तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
प्रहारच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे, शेतकरी, कष्टकरी, दिन-दुबळ्या व अपंग बांधवांच्या समस्यासाठी पुढाकार घेऊन न्याय देण्यासाठी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष वाढीसाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन बच्चू कडू ना साथ देणार असल्याचे परशुराम बनसोडे यांनी सांगितले.
कमी काळत प्रशासनावर वचक निर्माण केली आहे. या सर्व कामाची दखल घेऊन पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाच्या मिरज तालुका अध्यक्ष पदी परशुराम बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड जत येथे कार्यकर्ते मेळाव्यात करण्यात आली आऊन सोलापूर जिल्हा अध्यक्ष, दत्ता भाऊ मस्के, प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील, जत तालुका अध्यक्ष प्रमुख सुनील बागडे, मिरज तालुका प्रमुख गोरख वनखडे, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.