पाटणकर आय.टी.आय.मध्ये परिवर्तनाची घंटा ; नवनियुक्त प्राचार्य कोळी सरांचा झंझावाती प्रवेश

LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
पाटण प्रतिनिधी | नितीन खरात
ढेबेवाडी | मंद्रूळकोळे येथील विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय.टी.आय. कॉलेजमध्ये नव्याने नियुक्त प्राचार्य मा. एस.एम. कोळी सर यांचा स्वागत समारंभ व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डी.एड. व बी.एड.चे माजी प्राचार्य तथा शिस्तप्रिय शिक्षक श्री. रोडे सर यांनी कोळी सरांचा सत्कार करून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना रोडे सर म्हणाले की, कोळी सर हे अनुभवी, अभ्यासू व दूरदृष्टी असलेले शिक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा नक्कीच फायदा संस्थेला होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शिस्त राखली पाहिजे आणि आपल्या कॉलेजचे नाव लौकिक करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
नवनियुक्त प्राचार्य एस.एम. कोळी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी सांगितले की, अभ्यास आणि वर्तन या दोन्ही गोष्टींमध्ये सातत्य व प्रामाणिकता आवश्यक आहे. दिवस-रात्र परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. चांगल्या सवयी जोपासा, त्या तुमच्या भविष्याचा पाया ठरतील.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ निदेशक श्री. एस.बी. पाटील व सर्व निदेशक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निलेश काळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विक्रम पोरे सर यांनी केले. त्यांनी प्राचार्य कोळी सरांना सर्व निदेशक व शिक्षकवर्ग त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कॉलेज आदर्शवत करण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास दिला.
या नव्या नेतृत्वामुळे विद्यार्थी व पालक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संस्थेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.