Uncategorized

पूजा खेडकर नंतर आता IPS रश्मी चर्चेत, नवऱ्याच्या नको त्या कृत्यांनी आणलं अडचणीत

आता IPS रश्मी करंदीकर चर्चेत आहेत. आपल्या नवऱ्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे त्या चर्चेत आहेत. पुरूषोत्तम चव्हाणला मे महिन्यात अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

IAS पूजा खेडकर माजी IAS अभिषेक सिंह यांच्यानंतर आता IPS रश्मी करंदीकर चर्चेत आहेत. आपल्या नवऱ्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे त्या चर्चेत आहेत. IPS रश्मी करंदीकर यांचे पती पुरूषोत्तम चव्हाण यांना टीडीएस रिफंड फसवणूक प्रकरणात अटक झालीय. त्यांच्याबद्दल नव नवीन खुलासे होत आहेत. ऑगस्ट 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान व्यावसायिक राजेश बटरेजाकडून कथित पैसे आणि कागदपत्रांनी भरलेली बॅग आणण्यासाठी पुरूषोत्तम चव्हाण रश्मी करंदीकर यांच्यासाठी तैनात दोन कॉन्स्टेबल्सना पाठवलं होतं. पुरुषोत्तम चव्हाणला टप्याटप्याने 10.40 कोटी रुपये दिल्याच बटरेजाने मान्य केलं.

प्रवर्तन निर्देशालयने अलीकडेच 263 कोटी रुपयांच्या आयकर टीडीएस रिफंड फसवणूक प्रकरणात पूरक आरोपपत्र दाखल केलय. चव्हाण, बटरेजा, कर सल्लागार अनिरुद्ध गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. त्याशिवाय मेसर्स एजी इंटरप्रायजेज, मेसर्स यूनिवर्सल मार्केटिंग एंड एडवायजरी सर्विसेज एलएलपी (यूएमएएस) आणि ड्वालॅक्स एंटरप्रायजेज प्रायवेट लिमिटेड विरुद्ध तक्रार दाखल केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही