पैशाचे आमिष दाखवून महिलेस शारीरिक संबंधास भाग पाडल्याचा आरोप ; तिघांविरोधात ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
कुपवाड | एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध महिलेला पैशाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2024 ते जून 2025 दरम्यान मिरज तालुक्यातील वड्डी गावातील एका शेतातील घरात वेळोवेळी घडल्याची फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिलेनं तिला पैशांचे आमिष दाखवून वेगवेगळ्या दोन अनोळखी पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तिने त्या पुरुषांसोबत संबंध ठेवले, ज्यामुळे फिर्यादी आठ आठवड्यांची आणि तीन दिवसांची गर्भवती झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी फिर्यादीने आरोपी महिला आणि दोन अनोळखी पुरुषांविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवरून एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 211/2025 असा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(M), 3(5), तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(W)(i)(ii), 3(2)(V), 3(2)(V-a) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 2 : 21 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा (मिरज विभाग) करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून, अटक तजवीज सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.