महाराष्ट्र

ऐतिहासिक विजय, प्रचंड जनाधार ; शंभूराज देसाईंचा आभार मेळावा ठरला अविस्मरणीय

सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे

पाटण | पाटण विधानसभा मतदारसंघातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात वास्तव्यास असलेल्या मतदार-कार्यकर्त्यांचा “आभार मेळावा” १४ सप्टेंबर २०२५ रोजी लक्ष्मीनारायण म्हात्रे हॉल, ऐरोली, नवी मुंबई येथे उत्साहात पार पडला. “आभार आपल्या लोकांचे, संवाद आपल्या लोकांशी” या शीर्षकाने आयोजित या कार्यक्रमात राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री मा. श्री. शंभूराज देसाई यांनी मुंबईतील पाटणकर जनतेचे खास आभार मानले.

ऐतिहासिक विजयाचे श्रेय जनतेला

आपल्या भाषणात शंभूराज देसाई साहेब म्हणाले कि, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील विक्रमी ३५ हजार मतांची आघाडी हा पाटणकर जनतेच्या विश्वासाचा आणि मुंबईत स्थायिक मतदारांच्या अथक परिश्रमांचा परिपाक आहे. हा विजय केवळ माझा नाही, तर पाटण तालुक्याच्या एकदिलाने केलेल्या लढ्याचा फलित आहे.

चार पिढ्यांची जनसेवा, सत्ता असो वा नसो

स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या परंपरेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, देसाई परिवाराची जनतेशी असलेली नाळ चार पिढ्यांची आहे. सत्ता असो वा नसो, आमची बांधिलकी केवळ जनतेसाठी आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या पाटणच्या मतदारांनी दाखवलेल्या उत्साह, प्रोत्साहन आणि प्रेमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

“पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ उपक्रमातून दिलासा

पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न थेट गावोगावी सोडवले असल्याचा उल्लेख केला. ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून घेतलेले निर्णय व पाटण मतदारसंघात पर्यटन खात्यामार्फत उभारण्यात येणाऱ्या बोटिंग क्लब प्रकल्पाची माहिती देत त्यांनी विकासाची ग्वाही दिली. आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि शेती या सर्वच क्षेत्रात मतदारसंघाला गतवैभव मिळवून देणे हीच आपली ध्येयवेड आहे, असे ते म्हणाले.

मुंबईतले पाटणकर ठाम पाठीशी

या कार्यक्रमात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई दादा यांनी भाषण केले. त्यांनी मुंबईत वास्तव्यास असलेल्या पाटणकर जनतेच्या निष्ठा, त्याग आणि सहकार्याचे कौतुक करत, पाटण तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच योगदान देऊ, असा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्ते व मुंबईतील पाटणकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पुन्हा एकदा देसाई परिवाराला ठाम पाठिंबा दिला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या मेळाव्याला मा. श्री. रविराज देसाई (अध्यक्ष, मौरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी) तसेच मा. जयराज देसाई (कोअर कमिटी सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही