बजेटचा नीट अभ्यास करूनच वक्तव्य करा ; आमदार इद्रिस नायकवडींचा सुरेश खाडेंना जबरदस्त टोला

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | मिरजेच्या समस्या सुटण्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आला असूनही त्या समस्या अद्याप तशाच कायम असल्याची टीका करत आमदार इद्रिस नायकवडी यांनी सध्याचे आमदार सुरेश खाडे यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला आहे.
“गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार असलेल्या सुरेश खाडे यांनी आता तरी बजेटचा नीट अभ्यास करूनच वक्तव्य करावीत,” असा टोला नायकवडी यांनी लगावला. निधी असूनही शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी आणि आरोग्यसेवा या समस्या पूर्ववत राहिल्या आहेत, हे खाडे यांच्या अपयशाचे स्पष्ट उदाहरण असल्याचं नायकवडी म्हणाले.
मिरज शहरात विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा होत असून, प्रत्यक्षात नागरिकांना दिलासा मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. भरमसाठ निधी मंजूर होतो, मात्र त्याचा योग्य वापर आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही, असा आरोप त्यांनी केला.
आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नायकवडी आणि खाडे यांच्यातील हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हं आहेत.