बदलापूर अत्याचार प्रकरण ; मिरजेत शिवसेना आक्रमक ; सरकारचा निषेध : नराधम आरोपीच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याला दिली फाशी

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरज | बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकत असलेल्या चार वर्षाच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचारच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सर्व स्तरावरून या घटनेचा निषेध होत आहे. तसेच या प्रकरणी आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे.
बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना महिलांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याला फाशी देण्यात आली. बदलापूरकरांनी काल केलेल्या आंदोलनावर अश्रुधुर आणि लाठी चार्ज केल्यामुळे राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. मिरज मधील महाराणा प्रताप चौक येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली. तर महिला पदाधिकारी या चांगल्याचा आक्रमक झाल्या होत्या. ‘लाडकी बहीण’ म्हणून १५०० रुपये देण्यासाठी मोठे इव्हेंट केले जात आहेत. पण बहिणींच्या सुरक्षेकडे सरकारचे लक्ष नाही. त्यासाठी सरकारने काय केले. लवकरात लवकर आरोपींना फाशी देण्याची यावेळी मागणी केली आहे.
यावेळी सिद्धार्थ जाधव, बजरंग पाटील, चंद्रकांत मैंगुरे, किरण कांबळे, महादेव मगदूम, ज्योतीताई दांडेकर, मीनाक्षी पाटील, शाकीरा जमादार, जैनब शकिल पिरजादे, शकिल बावा पिरजादे, सरोजिनी माळी, महादेव हुलवान, पप्पू शिंदे, नीता आवटी, अशा पोतदार, सपुरा जमादार, गजानन माळी, अतुल रसाळ, आनंद रजपूत, बाळासाहेब हत्तीकर आणि बबन गायकवाड यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.