महाराष्ट्र

रेल्वेमंत्र्यांकडून १२८.७८ कोटी रुपये खर्चाच्या “मिरज कॉर्ड लाईन” प्रकल्पाला मान्यता

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

प्रतिनिधी | श्रीकांत यमगर

माननीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्या कडुन रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्यासाठी मध्य रेल्वे अंतर्गत रुपये १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन (१.७३ किमी) प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

मल्टी ट्रॅकिंग/फ्लायओव्हर/बायपास लाईन क्षमता वाढीअंतर्गत प्रस्तावित या धोरणात्मक उपक्रमाचे उद्दिष्ट मिरज जंक्शनवरील रेल्वे परिचालन लक्षणियरीत्या सुलभ करणे आहे, जे मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर आणि मिरज-लोंढा सारख्या मार्गांना जोडणारा एक प्रमुख इंटरचेंज पॉइंट आहे.

सध्या, कुर्डुवाडी किंवा हुब्बल्ली येथून येणारे आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या गाड्या इंजिन किंवा ब्रेकव्हॅन रिव्हर्स करताना सरासरी अर्धातास ते तासभर मिरज येथे थांबुन राहत असत. प्रस्तावित कॉर्ड लाईनमुळे या परिचालन विलंबांना दूर केले जाईल, ज्यामुळे नेटवर्क कार्यक्षमता सुधारेल.

पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि या प्रदेशात मालवाहतूक आणि प्रवासी गाड्यांचे कार्यक्षमतेने संचालन करण्याचा मार्ग मोकळा होईल.

यामुळे प्रवाशांची मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासाची दीर्घकाळापासून असलेली मागणी पूर्ण होणार आहे.
सध्या मालवाहतुक गाड्या या मिरज जंक्शन येथे थांबवुन राहत असल्याने मिरजेतील प्लँटफाँर्म क्र.4 हा मालवाहतुक गाड्यांसाठी कायम राखीव ठेवला जात आहे.या काँर्ड लाईन सुविधामुळे प्रवासी वाहतुकीसाठी मोकळा होईल व कुर्डुवाडी व हुबळी या दिशेकडून होणारी मालवाहतूक कोल्हापूर दिशेने जाण्याकरिता या गाड्या मिरज जंक्शनवर न येता परस्पर कोल्हापूरच्या दिशेने जातील यामुळे इतर प्रवासी गाड्यांना मिरज जंक्शन मध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे अनेक गाड्या मिरज जंक्शन येथे येतील व नव्याने काही गाड्या मिरज जंक्शन मधून सुरू करण्यात येतील असे मध्ये रेल्वेचे परिचलन अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी सांगितले.

मिरजेमध्ये कॉडलाईन होण्यासाठी मिरजेतील मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी उद्या होणाऱ्या सल्लागार समितीच्या बैठकीपूर्वी सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांसह डॉक्टर स्वप्नील नीला यांची भेट घेतली असता यावेळी मध्य रेल्वेचे परिचलन अधिकारी डॉक्टर स्वप्निल निला यांनी मिरज मध्ये काँर्ड लाईन मंजूर झाल्याचे सांगितले.

मिरज मधील कॉर्ड लाईन संदर्भात मिरजेतील विविध प्रवासी संघटना रेल्वे सल्लागार समिती सदस्य यांनी अनेक वेळा पाठपुरावा करून ही मंजूर करून आणल्याबद्दल सर्व सल्लागार समिती सदस्यांचे व सर्व प्रवासी संघटनांचे मिरज मध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी रेल्वे प्रवासी सेना चे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, वाय.सी. कुलकर्णी, मधुकर साळुंखे, सोपान भोरावत, कुंदन भोरावत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही