बारावीच्या परिक्षेआधीच विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल ; परिक्षेच्या तणावात संपवले जीवन

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | जयंत मगरे
मिरज | शहरातील भारतनगरात राहणाऱ्या बारावीचे शिकण घेत असलेल्या एका सतरा वर्षीय विद्यार्थ्यांने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. ही घटना रात्रीच्या नऊच्या सुमारास घडली आहे. प्रथमेश बाळासाहेब बिराजदार असे मृत मुलाचे नाव आहे. बारावी परीक्षेला परीक्षेच्या आदल्या रात्री विद्यार्थ्यांने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
प्रथमेश हा शहरातील शासकीय अकॅडमीमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. सोमवारी संध्याकाळी परीक्षेच्या तयारीसाठी अकॅडमीतील लेक्चर अटेंड करून तो रात्री आठ वाजता घरी परतला. घरी आल्यावर कुटुंबीयांशी थोडा वेळ संवाद साधल्यानंतर अभ्यासाच्या कारणाने तो वरच्या खोलीत गेला. मात्र, काही वेळातच त्याने अँगलला दोरी लावून गळफास घेतला. रात्री नऊ वाजता त्याला जेवणासाठी हाक मारली असता प्रतिसाद न मिळाल्याने घरच्यांनी खोलीत पाहिले. तेव्हा हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.
प्रथमेश अभ्यासात चांगला होता, त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल उचलले का? स्पष्ट झालेले नाही. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.