बेडग-बोलवाड रोडवर चारचाकी पलटी ; तिघांचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी : परिसरात हळहळ व्यक्त

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | आदी माने
मिरज | बेडग बोलवाड रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये तीघांचा मृत्यू होऊन एक जण गंभीर जखमी झाला आहे. बोलवाड हद्दीत हा अपघात झाला आहे. आहे. राजू बोजगार (वय. 36), दस्तगिर शेख (वय. 31), बंदेनवाज सय्यद (वय. 32) या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून इप्पू नाईकवाडी (वय 30) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेडग – बोलवाड गावाच्या परिसरात हा अपघात झाला आहे. या कारमध्ये एकूण चार जण प्रवास करत होते. बोलवाडच्या दिशेनं ही गाडी निघाली होती. भरधाव गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले, अनियंत्रीत झालेली चारचाकी पलटी झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर 1 जण जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर येथील नागरिकांनी रुग्णवाहिकेतून चार जणांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. तर यावेळी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित करुन एका वर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिरज तालुक्यातील बोलवाड गावाचे हे सर्व रहिवासी असून ते बेडग रस्त्यावरून बोलवाडकडे येत असताना चारचाकी गाडी पलटी झाल्याने ही घटना घडली आहे. या घटनेने बोलवाड गावावर आणि या कुटुबियांवर शोककळा पसरली आहे.