बोलवाडचे माजी लोकनियुक्त सरपंच सुहास दादा पाटील यांच्याकडून बोलवाड येथील बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप

LiVE NEWS | UPDATE
सांगली जिल्ह्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने बोलवाड येथे सुहास दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगाराचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बांधकाम कामगारांची नोंद करण्यात आली होती. आज नोंदणी कामगारांना भांडी संच मिळाले, आज बोलवाड येथील कामगारांना वाटप करण्यात आले.
सचिन दादा कांबळे युवा मंचकडून माझी लोकनियुक्त सरपंच सुहास दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला होता. त्यावेळी बोलवाड येथे बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने आज बांधकाम कामगारांना साहित्य मिळाले आहे. त्यामुळे माझी लोक नियुक्त सरपंच सुहास दादा पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी बोलवाडचे उपसरपंच सचिन दादा कांबळे, मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट महादेव दबडे, बारीक गस्ती, माझे उपसरपंच भाऊसो नरगच्च, माजी सरपंच पिंटू नाईक, लखन सर्वदे, हरून शिकलगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.