बोलवाड हद्दीतील गट नं. 194 मध्ये बपर झोन ओढा पात्रावर अतिक्रमण करून अकृषिक जमीन (NA) प्रक्रिया

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
उपसंपादक | परशुराम बनसोडे
बोलवाड हद्दीतील गट नंबर 194 मध्ये बपर झोन ओढा पात्रावर अतिक्रमण करून अकृषिक जमीन (NA) प्रक्रिया राबविण्यात येत आहे यामध्ये खरेदी विक्री प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, बोलवाड हद्दीमधील गट नंबर 194 मध्ये ओढा पत्रावर अतिक्रमण करून प्लॉटिंगचे काम सुरू आहे. सदर जागेवर कोर्ट केस असताना खरेदी विक्री प्रक्रिया ही महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
सदर जागेवर मुंबई हायकोर्ट मध्ये केस चालू असताना खरेदी विक्री कशी होते. सदर जागेवर पांडुरंग डेव्हलपर्स इस्टेट एजन्सी यांच्याकडून प्लॉटिंगची विक्री सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते. यामुळे तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून अकृषिक जमीन (NA) प्रक्रियाची व प्लॉटिंगची प्रक्रिया तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत.
सदर प्रकरणाची येणाऱ्या आठ ते दहा दिवसात चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. येणाऱ्या आठ दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती परशुराम बनसोडे यांनी दिली आहे.