बोलवाडचे पहिले माजी लोकनियुक्त सरपंच यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मान्यवरांच्या हस्ते साजरा

LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
बोलवाड गावचे पहिले माजी लोकनियुक्त सरपंच मा.सुहास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला.
मिरज विधानसभा क्षेत्राचे युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊ चे वाटप करण्यात आले. बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले.गावामध्ये विविध ठिकाणी 3000 वृक्षारोपण लावण्याचा शुभारंभ संपन्न झाला आहे. कार्यक्रमाचे आयोजन सचिन दादा कांबळे युवा मंच चे वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमास गावातील विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन सुहास दादा पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुशांत दादा खाडे उपस्थित राहून माझी लोकनियुक्त सरपंच सुहासदादा पाटील यांना शुभेच्छा देण्यात आले आहेत.
उद्योगपती सी. आर. सांगलीकर, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, सोसायटीचे माजी चेअरमन, सरपंच निगार शेख, उपसरपंच सचिन कांबळे तसेच ग्रामपंचायत चे सर्व सदस्य तसेच गावातील विविध पदाधिकारी यांनी सुहास दादा यांना भेटून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश सांगावे, प्रवीण पाटील, पिंटू नाईक, रमजान शेख, राजू शेख, सतीश गस्ते, शाम कांबळे, बाळु सरवदे, शुभम कांबळे, लालू नाईक, आदी उपस्थित होते.