महाराष्ट्रविदर्भ

भीषण आगीत लाखोंचे नुकसान; न्यू इंडिया ॲश्युरन्सला ग्राहक आयोगाकडून दणका

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

व्ही. बी. लेबर सप्लायर्सचे प्रो. बबन विठ्ठलराव सातपुते यांनी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीकडून साडेचार कोटींचा विमा घेतला होता. दिनांक ३ मे २०२१ रोजी सातपुते यांच्या सोयाबीन पासून गट्टू तयार करणाऱ्या प्लांटला भीषण आग लागली. सुमारे सहा तास लागलेली ही आग कुटार, कच्चा माल आणि तयार माल यांचा लाखोंचा संपत्ती जाळून गेली.

सदर नुकसानाची रक्कम अंदाजे ६७,५७,०३०/- रुपये होती. विमा कंपनीकडे सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर सर्वेयरांची नेमणूक झाली, मात्र १९ जुलै २०२२ रोजी कंपनीने नुकसान भरपाई नाकारली. तक्रारदारांनी ॲड. पवनकुमार भन्साळी यांच्या माध्यमातून ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. त्यांनी म्हटले की, विमा कंपनीने नियम व अटी आधी सांगितले नाहीत; ही आग अपघाती होती; सर्वेयरांनीही ३३,१७,३३७/- रुपये नुकसान झाल्याचे मान्य केले, तरी फॉरेन्सिक अहवाल दाखवला गेला नाही.

विमा कंपनीने सर्व दावे फेटाळले, पण आयोगाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद ऐकून निकाल दिला की ही आग अपघाती असून तक्रारदारांना नुकसानभरपाई द्यावी लागेल. आयोगाचे अध्यक्ष श्रीमती वैशाली आर. गावंडे व सदस्य श्री नागेश बी. उबाळे यांनी ठरवले की, रक्कम ३३,१३,३३७/- रुपये नुकसानभरपाई, ९% व्याज १७ एप्रिल २०२३ पासून, तसेच तक्रारीचा खर्च ७०,०००/- रुपये दिला जावा. यामुळे १७ सप्टेंबर २०२५ पर्यंत न्यू इंडिया ॲश्युरन्सला एकूण ४१,०९,३८७/- रुपये भरावे लागणार आहेत.

हा निकाल विमा कंपन्यांसाठी धडा आहे की अनुचित पद्धतीने नुकसान नाकारल्यास ग्राहक आयोग कठोर कारवाई करू शकतो.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही