राजकीयविदर्भसामाजिक

मंगरुळपीरचा ‘द रिअल हिरो’ ; विकासाचा चेहरा अशोकभाऊ परळीकर

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

मंगरुळपीर | मंगरुळपीर नगरीचा कोहिनूर हिरा म्हणून जनमानसात विशेष स्थान मिळवलेले लोकप्रिय लोकनेते अशोकभाऊ परळीकर आज मंगरुळपीर तालुक्यात विकास, पारदर्शकता आणि जनसंपर्काचे नवे अध्याय लिहीत आहेत. साधेपणा, जमिनीवरची कार्यशैली आणि सर्वसमावेशक विचारसरणी यामुळे ते सर्व समाजघटकांचे प्रिय नेते ठरले आहेत. त्यामुळेच मंगरुळपीर नगराध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे द्यावी, अशी उत्सुकता मतदारांमध्ये दिसून येत आहे.

नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात अशोकभाऊ परळीकर यांनी मंगरुळपीर नगरातील मूलभूत सुविधांच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले. त्यांच्या पुढाकारातून शहरातील अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लागले. शहरातील रस्ते व पायाभूत सुविधांची उभारणी, मुख्य चौकांपासून उपनगरांपर्यंत काँक्रीट व डांबरी रस्त्यांचे जाळे उभारणे, खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळाला.

पाणीपुरवठा सुधारणा जुन्या पाईपलाइनचे नूतनीकरण, वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने नवीन जलस्रोत व पाणीटाकी योजना, प्रत्येक वॉर्डाला नियोजनबद्ध व नियमित पाणीपुरवठा ही त्यांची महत्त्वाकांक्षी भूमिका होती.

स्वच्छता मोहीम शहर स्वच्छतेत आघाडी राखण्यासाठी विशेष मोहीमा राबविण्यात आल्या. कचरा व्यवस्थापन, वॉर्डनिहाय स्वच्छता कर्मचारी, नाल्यांची नियमित साफसफाई आणि प्लास्टिकमुक्त मंगरुळपीर चळवळीमुळे शहराचा दर्जा उंचावला.

प्रकाश व्यवस्था सुधारणा शहरातील अंधारे कोपरे ओळखून नवीन एलईडी दिव्यांची बसवणी करण्यात आली. खराब दिव्यांचे तातडीने बदल करण्यात येत राहिले. यामुळे सुरक्षितता आणि सौंदर्य दोन्ही वाढले.

सर्वसमावेशक नेतृत्व : सर्व समाजाचा आधारस्तंभ

अशोकभाऊ परळीकर हे फक्त विकासकामांसाठीच नव्हे, तर जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे नेता म्हणूनही ओळखले जातात. गरजू कुटुंबांना आर्थिक-सामाजिक मदत, वैद्यकीय सहाय्य, विद्यार्थ्यांना साहित्य मदत, महिला बचतगटांना रोजगार संधी, शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनात मांडून त्याचा सकारात्मक पाठपुरावा, युवा वर्गासाठी रोजगार व क्रीडासाहित्य उपलब्ध करून देणे, अशा अनेक उपक्रमांमुळे ते सर्वांच्या मनात स्थान निर्माण करू शकले.

मंगरुळपीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी दूरदृष्टी

भविष्यातील आधुनिक मंगरुळपीर कसं असावं याचा विचार करून अशोकभाऊ परळीकर यांनी अनेक नवे आराखडे साकारले आहेत. स्मार्ट मंगरुळपीर प्रकल्प, आधुनिक क्रीडांगण, विस्तृत वृक्षारोपण मोहिमा, वाहतूक कोंडीवरील उपाययोजना, आरोग्य सुविधा उभारणी–या योजनांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

जनतेचा विश्वास आणि लोकप्रियतेची ताकद

अशोकभाऊ परळीकर यांची सर्वात खास बाब म्हणजे लोकांशी सतत संवाद साधण्याची त्यांची पद्धत. प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक कार्यक्रमात आणि प्रत्येक अडचणीत ते लोकांसोबत उभे दिसतात. परिणामी, त्यांच्यावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.

मंगरुळपीर शहराच्या सर्वांगीण विकासाची गंगा वाहणारा नेता म्हणजे अशोकभाऊ परळीकर, अशी आज नागरिकांची धारणा झाली आहे. शहराच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला ध्यास आणि त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे मंगरुळपीरचा चेहरामोहरा बदलत आहे.

त्यामुळेच मंगरुळपीरचा खरा कोहिनूर हिरा म्हणजे अशोकभाऊ परळीकर अशी जनमानसातील चर्चा असून येणाऱ्या नगरपरिषद अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यासाठी नागरिक मतरूपी सहकार्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही