मंगरुळपीरचा पवन आडे राज्यसेवा परीक्षेत (DT-A) प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम
पिंपळगावच्या शेतकरी पुत्राचा परिश्रमाचा विजय, आता होणार ‘बीडीओ

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळगाव (ई.) या छोट्याशा खेड्यातील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश लक्ष्मण आडे यांचा मुलगा पवन आडे याने आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा (MPSC) उत्तीर्ण करत DT-A प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अधिकारी होऊन समाजासाठी काहीतरी करण्याचं स्वप्न अनेक तरुणांच्या डोळ्यात असतं; मात्र ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारी मेहनत, संयम आणि आत्मविश्वास या तिन्हींचं उत्तम मिश्रण पवन आडे यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाने मंगरुळपीर तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे.
पवन यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव इजारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढील शिक्षण त्यांनी अनसिंग येथील संस्कार साधना विद्यालय, सुपखेल येथील सैनिक शाळा, तसेच अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि राहुरी येथे एम.एस्सी. पर्यंत पूर्ण केले. शिक्षणासोबतच त्यांनी एमपीएससीची तयारी सातत्याने केली.
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून आलेल्या पवन आडे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता राज्यसेवेतील सर्वात प्रतिष्ठित परीक्षेत अव्वल येत ‘क्लास 1 अधिकारी’ बनण्याचा मान मिळवला आहे.