गुन्हे विश्व्

मंगरुळपीरच्या आठवडी बाजारात जाल, तर मोबाईल हरवून बसाल

वाशीम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत

मंगरुळपीर येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. मंगरुळपीर तालुक्यातील ७५ खेड्यातील लोक या बाजारात खरेदी विक्रीसाठी येत असल्याने हा बाजार नेहमी गजबजलेला असतो. याच गर्दीचा फायदा घेवुन चोरटे अनेकांच्या महागड्या मोबाईलवर हात साफ करत असल्याच्या घटना दर आठवड्याला घडत असल्याने या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर ऊभे राहले आहे. दि.३ आॅगष्ट रोजीही मंगरुळपीर येथील आठवडीबाजारातुन गणेश राऊत यांचा महागडा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार पो.स्टे.ला दाखल केली आहे. याच दिवशी इतरांचेही मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारीही आहेत.

बाजार म्हटला की, आठवडाभर पुरेल असा भाजीपाला, किराणा तसेच इतर रोज वापरात लागणार्‍या गृहपयोगी वस्तुची खरेदी केल्या जातत्. मंगरुळपीर येथेही दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात तालुक्यातील ७५ खेड्यातले तसेच मंगरुळपीर शहरातील लोक बाजारासाठी येतात व व्यापार्‍याकडुन वस्तुंची खरेदी करतात. हा आठवडी बाजार गजबजलेला असतो. खुप गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे बाजारात येणार्‍या लोकांच्या खिशातुन मोठ्या शिताफीने मोबाईल चोरुन पसार होतात. दर बाजाराच्या दिवशी असे मोबाईल चोरीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारीही पोलीसांकडे येत असतात.

असाच प्रकार दि. ३ ऑगस्ट रोजीच्या शनिवारी भरलेल्या मंगरुळपीर बाजारात घडला. मंगरुळपीर शहरातील व्यावसायीक गणेश राऊत यांचा व्हिवो कंपनिचा महागडा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्यांनी यासंदर्भात रितसर लेखी तक्रार पो.स्टे.ला दाखल केली आहे. सोबतच इतरही काहींचा मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहे. दर आठवड्याला अशा चोरीच्या घटना बाजारात घडत असल्याने पोलिसांनी या बाबीकडे गंभीरतेने घेणे आवश्यक झाले आहे. या मोबाईल चोरट्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळाव्या अशी मागणी आता होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page

तुम्हाला मराठी वाचता येते का ? होय. नाही