
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी | फुलचंद भगत
संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगरुळपीर येथे सामाजिक ऐक्य व सेवाभावाचा अनोखा संदेश देणारा खिचडी वाटप उपक्रम मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात संत रविदासीय महिला मंडळ व चर्मकार समाजाच्या वतीने या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांचे सामाजिक समतेचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक असल्याचे सांगितले. महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही संतांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त करून समाजात त्यांनी रुजवलेल्या मूल्यांची आठवण करून दिली.
पुण्यतिथी निमित्त उपस्थित नागरिकांसाठी खिचडी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतांच्या स्मरणाला वाहिलेल्या या सेवेचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संयोजन संत रविदासीय महिला मंडळाने उत्साहात पार पाडले.
या प्रसंगी चंचलताई खिराडे, कल्पनाताई पाटील, चंचलाताई पाटील, ललिताताई खिराडे, लक्ष्मीताई खिराडे, श्वेताताई राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक सौहार्द, सेवा व समानतेचा संदेश देणारा हा उपक्रम मंगरूळपीरमध्ये आदर्शवतरीत्या साजरा करण्यात आला.